You Tube वर अभ्यासाचे Videos बघत असतानाच नेमका Notifications मध्ये तुझा msg झळकतो...
चालू You Tube app ची पर्वा न करता Notifications वर Click करून मी सरळ Whatsapp मध्ये घुसतो..
आपलं चॅटिंग सुरू होतं...
"अभ्यास गेला तेल लावत.." असं म्हणत मी उत्साहाने Prolonged chatting साठी तयार होतो..
तुझा msg येतो...
- '.... Ahes ka.....?'
- 'Ha bol na... Kay zala..?
- 'Thoda bolaycha hota..'
- 'Ha bol ki... Prastavana kashala..? 😂'
- 'Tuza mood chaan distoy.....
Jau de... Nantr boluya apan...'
- 'Kay zalay...? Anything serious..?'
- 'Otipotat dukhtay re.....'
तिच्या या msg ने एकदम सगळं वातावरण बदलून जातं आमच्यातलं....
मला दोन मिनिटं कळतच नाही काय द्यावी reaction...
एकदम असं stunned झाल्यासारखं होतं सगळं...
कानात घातलेले earphones माझ्याच नकळत मी काढून टाकतो....
मी काही reaction च देत नाही... कारण मला खरंच कळत नाही काय बोलावं...
Actually इथे असं whatsapp वर बोलण्यापेक्षा मी आत्ता तिच्या इथे पाहिजे होतो...
काहीतरी केलं असतं... हात हातात घेतला असता... धीर दिला असता....
इथे बसून मी काय करू...?
काय करायला पाहिजे मी ज्याने तिला एकदम बरं वाटेल...?
हेही कळत नाहीये का माझं मला....?
म्हणजे मी बावळट आहे का...?
एक साधं solution सुचत नसेल मला, तर काय अर्थय आमच्या नात्याला...?
या सगळ्या विचारांच्या जंजाळात, मी तिला काहीच रिप्लाय दिलेला नसतो...
- 'Aai la sangitlas ka...?' मी खूप विचार करून हा msg लिहीतो...
- 'Ho... Aai detye garam panyachi pishawi karun....'
- 'call var boluyat ka.....?'
माझ्या या msg वर ती काहीच रिप्लाय देत नाही...
मी दोन मिनिटं तिच्या रिप्लाय ची वाट बघतो आणि न राहवून तिला फोन लावतो...
माझ्याशी बोलून तिला बरंच बरं वाटतं...
"चला.. काहीतरी करता आलं आपल्याला तिच्यासाठी ! "
पण एक महत्वाची गोष्ट लक्षात येते माझ्या....
आजवर whatsapp च्या नादी लागणाऱ्या मला आज या whatsapp च्या मर्यादा लक्षात आलेल्या असतात...
जेव्हा आम्हा दोघांच्या नात्यात असा एखादा क्षण येतो, जेव्हा एकमेकांच्या आधाराची खरी गरज असते, तेव्हा तोकडं पडलं हे whatsapp चॅटिंग... हे जाणवतं मला..
आपल्या माणसांशी स्वतःच्या तोंडून बोललेले दोन शब्द जे समाधान देऊन जातात, ते whatsapp वरचं चॅटिंग कितीही केलं तरी नाही मिळत हे पुरतं पटलं मला....
- आशुतोष पुरोहीत
9763057283
(WA/call/msg)
सुरेख भावा!!अप्रतिम व अविस्मरणीय blog.
उत्तर द्याहटवाMasta!!
उत्तर द्याहटवा