तुझ्या चॅट वर 'typing...' असं हिरव्या रंगात उमटतं...
माझं दिल 'धडकायला' लागतं...
मी तुझ्या चॅट वर क्लिक करतो...
बराच वेळ तू काहीतरी type करत असतेस..
मग अचानक तुझ्या नावाखाली 'online' असं येतं..
थोड्या वेळाने पुन्हा 'typing...' , पुन्हा 'online' ....
मी गोंधळतो...
असं अडखळत आणि थांबत थांबत का typing करत्ये ही..?
मी अजून थोडा वेळ patience ठेवतो.. तरी तुझा msg नाही...
इतका का वेळ लागतोय हिला type करायला...?
ही खोडत्ये का मध्ये मध्ये लिहलेलं..?
कारण जरी खोडण्यासाठी backspace चं बटण दाबलं तरी whatsapp वर 'typing...' असंच येतं !
मग तसं असेल तर का खोडत्ये ही लिहलेलं ?
इतकं सांभाळून आणि मोजून मापून का बोलावं लागतंय तिला माझ्याशी..?
ती तर काहीही आणि कसंही बोलू शकते ना माझ्याशी.....
की कोणापासून लपवत लपवत typing करत्ये...?
थोड्या वेळाने बघतो.. तर ती ऑफलाईन गेलेली असते...
तिचा last scene दिसायला लागतो..
माझ्या डोक्याचा भुगा होतो विचार करून करून..
ही काय लिहीत होती..?
आणि इतकी अशी बिचकत का होती जे लिहलंय ते send करायला... ?
बिंधास्तपणे, मोकळेपणाने का नाही बोलू शकते ती माझ्याशी..?
कुठेतरी loop holes, अपूर्णत्व आहे याचा अर्थ अजूनही आमच्या नात्यात....
विचारुया का तिला..?
जाऊ दे... संध्याकाळी विचारू... तोपर्यंत तीही जरा शांत झाली असेल...
मी संध्याकाळी तिला msg टाकतो..
'Aj dupari tu satat kahitari type karat hotis pan send matra karat navtis.. Kay zalay sangshil ka mala ? Kahi problem ahe ka ? Tasa kahi asel tar please bol... Kay type karat hotis tu...?'
यावर तिचा रिप्लाय....👉
- Arrreeeeeee Mazya aatyachi mulgi ali hottii chotii.... Pahilit ahe tii..... Ti khelat hoti phone shi mazya....
Kiti vichar kartos.....
Vedaaa kuthchaa.....😂😂😂😂😂😂
खरंच.....
साध्या आणि innocent गोष्टींचा विचार करून करून किती चुथडा करतो नाही आपण !
- आशुतोष पुरोहित
9763057283
(WA/Call/msg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा