मी whatsapp मधून बाहेर पडतो..
स्क्रिन लॉक करून फोन बेंच वर ठेवून देतो..
बरोबर पुढे बसलेल्या मुलाच्या पाठीला चिकटवून फोन ठेवतो..
जेणेकरून प्रोफेसर ना माझ्या बेंच वरचा फोन दिसू नये...
"Ok... So this is basically what boundary layer thickness is.... Now, we will see what is the difference between thermal boundary layer &..." 👈 यातलं सरांचं एकही अक्षर मला कळलेलं नसतं..
माझा फोन vibrate होतो...
'आमच्यातल्या रिलेशन मधला बॅलन्सच गेलाय.. लेक्चर चालू असताना का msg करते ही.. पकडलो गेलो तर...?'
👆 माझं मन..
'Nantr boluya..' मी msg टाईप करतो पण सरांची नजर चुकवत तो send करता येत नाही मला..
अचानक माझा फोन vibrate व्हायला लागतो..
मी बघतो, तर तुझा call येत असतो..
माझे 45 msgs बघून आला असावा.. मी अंदाज बांधतो..
मी फोन झटकन उचलतो आणि बेंच खाली तोंड लपवून,
"Lecture मध्ये आहे, msg कर.." असं म्हणतो..
बेंच खाली लपवलेलं तोंड जेव्हा वर काढतो, तेव्हा आजूबाजूची मुलं वहीत काहीतरी लिहिताना दिसतात..
मी शेजारच्याच्या वहीत डोकावून तो काय लिहतोय बघतो..
कसलंतरी Numerical असतं..
मी फक्त त्या Numerical चा 'Given Data' लिहून टाकतो..
आता सरांची पाठ... ते Numerical सोडवतायत फळ्यावर..
मला चांगला chance मिळतो...
तेवढ्यात मी तिला 'Hiii' टाकून घेतो...
पण ती ऑफलाईन..!
मी वैतागतो..
खरंच बॅलन्स गेलाय आमच्यातला... मी मनाशी म्हणतो..
मी वहीआड फोन लपवून तिच्या msg ची वाट बघत बसतो..
'Sampla Lecture..?' फायनली तिचा msg येतो..
'Nai, chalue.. Sampel 10 minitat..' मी.
'Ok' ती.
"So... What is your answer Mr. Ashutosh..?" 👆 सर...
माझं नाव घेतल्यामुळे मी दचकून वर बघतो.. सगळा वर्ग मान वळवून वळवून माझ्याकडे बघत असतो.. माझ्या मनात येतं, "येईल लेको... एक दिवस तुमच्यावरही ही वेळ येईल.. शेवटी जो पकडला जातो तो चोर..."
" नाही आलं सर.." मी शांतपणे म्हणतो..
आता सर "का नाही आलं?" हे विचारणार आणि माझा मोबाईल त्यांना दिसणार मग अख्ख्या वर्गासमोर राडा होणार... हे ठरलेलं...
असं सगळं माझ्या मनात चालू असतानाच.....
सर मला काहीही न बोलता सर सरळ दुसऱ्या मुलाकडे वळतात...
मी आश्चर्याने सुटकेचा निःश्वास टाकतो.. पटकन शेजारच्याच्या वहीतून ते numerical कॉपी करून घेतो.. आत्ता सुटलो म्हणजे पुन्हा सुटू असं नाही ना !!
मग बऱ्याच मुलांना विचारून हिंडून फिरून आल्यावर सर शेवटचा रोल कॉल घ्यायला लागतात..
"...... Roll no. 49... Roll no. 49.....?"
" तो whatsapp बघतोय सर.... "
कोणीतरी जोरात ओरडतं....
मी : "नाही सर, मी............"
- आशुतोष पुरोहित
9763057283
(WA/call/msg)
फारच छान..प्रत्येक कॉलेजमध्ये होणारी गोष्ट नेमकी टिपली आहेस.
उत्तर द्याहटवा