गुरुवार, ५ जुलै, २०१८

Whatsapp Diaries 10

..... आणि आज रात्री मी तुझा dp न्याहाळत खिडकीत बसलोय....

दोन दिवस आपण काहीच बोललेलो नाही...
रागावून नाही, सहजच.. 

तुझ्या नावाशेजारी 'Call' ची sign असते..
मी पटकन तुला कॉल लावतो आणि एक रिंग वाजल्याची खात्री करून लगेच कट करतो..
खाली लिहितो, 'Chukun lagla.. Sorry..' 

या 'Chukun lagla.. Sorry' मध्येच तुला कळून जातं, की याचा अर्थ मी तुझा dp बघत होतो.. आणि तो बघताना बोटाच्या चुकीच्या टच ने दगा दिला.. 
किंवा, मी त्याला तो देऊ दिला !!!

संभाषण सुरू करायला एवढं निमित्त पुरतं..
मला हेच हवं असतं.. 

तुलाही हे सगळंच कळलेलं असावं बहुदा..
म्हणूनच तू 'कॉल' या विषयावर काहीही न बोलता तुझा दिवस कसा गेला हे अपणहूनच मला सांगायला सुरुवात करतेस... 
Msgs वर msgs , msgs वर msgs... तुझ्या चॅटबॉक्समधून माझं whatsapp बाहेरंच पडू इच्छित नसतं.. 

इतक्यात कॉलेज च्या सरांचा ग्रुप वर msg येतो.. 
"काय राव... इथे पण सोडत नाहीत हे .."
वैतागून मी ग्रुप चा चॅट ओपन करतो.. 

'Tomorrow is the last date to submit all assignments' 
डोक्यात तिडीक जाते..

तुला हे काहीच माहिती नसतं.... 
तरीही तू शांतपणे ऑनलाईन थांबलेली असतेस माझ्यासाठी.. 
मला अगदी आदर्श 'सहचारिणी' वगैरे वाटतेस अशा वेळी..

मी वैतागून झालेला प्रकार तुला सांगतो... 
तू उलट मलाच assignments लिहायला पिटाळतेस.. 

'Aadhi offline jaa... Tuza last seen diseparyant mi ithech thambnar ahe...' 
तुझा दम.. 

मी 'आलिया भोगासी..' म्हणत ऑफलाईन जातो.. 
Earphones वर गाणी ऐकत assignments करायला लागतो... 

मग कधीतरी रात्री 2-3 वाजता assignments संपवून मी झोपायला जायला निघतो.. 
झोपताना जेव्हा whatsapp बघतो... तुझा last seen आपल्या conversation च्या वेळचाच असतो... 

तुझ्या या deadly loyalty ला सलाम करत मी समाधानाने झोपायला जातो... 

- आशुतोष पुरोहित
9763057283
(WA/Call/Msg)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा