मंगळवार, २१ मे, २०१९

Whatsapp Robot

'सगळे जण सुखी आहेत आपापल्या जगात.....'
काल माझी whatsapp ची contact list चेक करत असताना मनात विचार आला... सगळ्यांचे dp आणि स्टेटस आकर्षक होते, exhibition मध्ये stall मांडावेत तसे... जगाच्या नजरेत आपलं चांगलं मत व्हावं, याची पुरेपूर काळजी घेणारं, प्रत्येकाचं whatsapp profile...
किती आत्मकेंद्री झालोय आपण, असं वाटलं.. आपण बरं, आपलं whatsapp, facebook बरं.. असं चाललेलं असतं आपलं..आपल्याच chat box च्या कोशात वावरत असतो आपण.. कोणाचा msg आलाय का, कोणाला msg करायचाय का हे खूप frequently येणारे विचार असतात आपल्या मनात हल्ली.. Contact list scroll down करताना, कोणीच असं दिसलं नाही, की जिला किंवा ज्याला msg केल्यामुळे माझी excitement वाढेल आणि 'खरा' response येईल... नाहीतर, 'कसा आहेस?' ला 'छान' हे ठरलेलं उत्तर आहेच ! ते काही पुरतं खरं नसतं, हेच पुरतं खरं असतं... 'दिला'तल्या गोष्टींपेक्षा 'courtesy' च्या गोष्टी वाढू लागल्यात हल्ली... अर्थात, whatsapp वर तेच सोयीचं असतं म्हणा..!
एखादा माणूस 'कसा आहे?' या general विचारलेल्या प्रश्नाला देऊन देऊन किती मोठं उत्तर देणार हो ! काय काय घडत असतं घडीघडीला सतत.. छोटं-मोठं, बरं-वाईट आणि बरंच काही ! सगळंच कुठे सगळ्यांना सांगतो आपण..
अगदी जवळचे जे असतात ना, त्यांच्याचपाशी मनातलं मोकळेपणाने बोलू शकतो आपण.. मग त्यांनी 'कसा आहेस?' वगैरे विचारायची आवश्यकता पण नसते.. फक्त 'bhetaychay..' इतका msg पुरेसा असतो किंवा आपला एक missed call.... बस ! पुरतं तेवढं.. अशी माणसं आपल्या आयुष्यात असणं, ज्यांच्यासोबत whatsapp च्या courtesy पलीकडे जाऊन 'काही जिवापासचं' आपण share करू शकू, ते ऐकू शकतील आणि मुळात त्यांना ऐकायला वेळ असेल, हे सगळं लाभणं खूप भाग्याचं आहे, नाही ? नाहीतर हल्ली generally वेळ नसतो कोणाला, आपलं whatsapp सोडून दुसऱ्याचं ऐकायला..
असो...
एखाद्या 'whatsapp robot' सारखं आपलं आयुष्य होऊ नये, त्यात कुठेतरी 'माणूसपण' जिवंत असावं असं मला वाटतं..
तरच जगायला मजा येईल, आणि 'kasa ahes?' चं 'chaan' हे उत्तर खरं ठरेल...!

-तोषा...
(Ashutosh Amod Purohit)

३ टिप्पण्या: