रविवार, ११ जून, २०२३

रसिका तुझ्याचसाठी !

उदास हुरहूर विहरे, शांत नदीच्या काठी...

तिथेच माझे सृजन जन्मते, रसिका तुझ्याचसाठी..!!

चन्द्रमा सजवी चांदणे, त्या रातराणीच्यासाठी...
तशी भूमिका स्फुरे अंतरी, रसिका तुझ्याचसाठी..!!

प्रखर रवी मावळे, विश्वाच्या विश्रामासाठी...
तसा माझ्यातुनी "मी" मावळतो, रसिका तुझ्याचसाठी..!!

अथांग नभापल्याड वसति,  स्वर्गसुखाच्या कोठी...
तसाच आणिला आनंदसागर, रसिका तुझ्याचसाठी..!!

प्रतिबिंब दिसे आभाळाचे, जसे समुद्रावरती..
माझ्या कलेचे पडसादही तसे तुझ्या जीवनावरती..!!

स्वर्गामध्ये नाही जुळल्या या नात्याच्या गाठी..!!
तर, सूर-तालांनी त्या 'जडविल्या', रसिका तुझ्याचसाठी !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा