रविवार, ११ जून, २०२३

आभाळमाया

 उजाड, रूक्ष दुष्काळात भर दिवसा अंधारलं...

सावळ्या, आशादायी ढगांनी, आभाळ भरून आलं..

एक एक कण मातीचा, चिम्ब व्हाया आसुसलेला..
वर्षागीत गाण्यासाठी सूर कोकीळेचा थबकलेला..

वारासुद्धा थांबलेला, वर्षा-वर्षाव पहावयाला..
साऱ्या सृष्टीच्या नजरेत, जणू चातक जन्मलेला...

भरून आलं आभाळ, तसे भरुनी आले डोळे...
भोळ्या-भाबड्या नजरांमध्ये उद्याचं भविष्य तरळे...

वाऱ्याची मंद आलापी, पहाडी वर्षावाची चाहूल देते...
उत्कंठा शिगेला नेउनी, अखेर आभाळमाया पाझरते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा