रविवार, ११ जून, २०२३

एक भेट

 


गर्द निळा शांत घन, चाहुली पायवाटी..
सोनसळी उन्हात सखे, तुझ्या माझ्या भेटी...

पायी रव तो पाचोळयांचा, तरीही सखोल शांती...
मंद सुरात कोकिळेच्या, धुंद तांबडी माती...

आकाश कोवळे, शीतल वारा, उंबरठा आतूर...
खुणावे चाफा मज, उंबऱ्यावर, त्यास तुझा मोहर...

अलवार मिठी अंगणामध्ये, उन्हाची अन गवताची..
अलगुज होई दोन जीवात अन साथही निसर्गाची..

कौलांवरूनी उन्हे खेळती, पागोळ्यांची झुंबरे होती..
सुंदर घरात नाना ऋतू मज तुझीच चाहूल देती...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा