दूर कोरडी वस्ती, डोंगराच्या पायथ्याशी l
सले एक खंत आत, उरे चांदणे उपाशी.. ll
त्या कोरड्या वस्तीला, ना भीती आसवांची...l
श्वास श्वास गोठलेला, भीती थंडीला उबेची ! ll
आक्रस्ताळे मूल मूल, निजे आईच्या कुशीत..l
आक्रोश त्या वस्तीचाही, मिटे डोंगरमुशीत...ll
आता वस्ती शांत शांत, तिचे एक पहाटगाणे..l
घनदाट धुक्याआड, थिजली प्रकाशकिरणे...ll
स्पंदनांचा शब्द शब्द, आता होई केवळ कातर.. I
मिटे वस्ती, उरे मागे आठवणींचा दुबळा डोंगर... II
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा