शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

Valentine's Day

 " Engineering मधल्या कुठल्याही component च्या edge ला देतोस, तशी तुझ्या स्वभावालाही थोडी गोलाई दे.... Fillet म्हणतात न त्याला... इतका टोकदार स्वभाव बरा नाही.. "


मरिन ड्राईव्ह च्या कट्ट्यावर वाऱ्याने उडत असलेले केस सावरत ती म्हणत होती मला... नंतर नंतर सोडून दिलं तिने त्या वाऱ्याची मन्नतवारी करणं... उडू देत काय उडायचेत ते केस.. एकटक बघत होती मावळत्या सूर्याकडे... काय पाहत होती त्यात कुणास ठाऊक... शोधत होती वाटतं काहीतरी हरवलेलं....! 

" कशाला हवाय हा खोटा मऊपणा...? तसंही फार नाही दिवस राहिले आता आपले एकत्र राहण्याचे..." 

" मान्य आहे, व्हायचंच आहे वेगळं... पण वाट तरी थोडी मऊ होईल ना वेगळं होण्याची..."

" वाट मऊ असली ना तर मोह होतो त्या वाटेचाच... त्यापेक्षा खडबडीत वाटच बरी... जे काही सत्य असेल ना, ते टोचून सांगते तरी ती धड..."

" नको थांबूया आपण आता फार वेळ इथे... जितकं जास्त वेळ इथे एकत्र थांबू ना आपण, तितकं अवघड होईल आपल्या दोघांना पुन्हा एकट्याने इथे येणं....." 

" खरंय तुझं... हा decision मात्र पटकन घेतलास..." 

" एकदाच काय तो रक्ताळून  जाऊ दे ना पाय.... मऊ वाटेच्या खोट्या आशा कशाला.........?
नाही का..? " 

" माझ्यासारखच बोललीस.." 

इतक्यात तिथे एक फुलवाला आला..
" दादा, आज valentine's day आहे.. वहिनींसाठी एक गुलाब घ्या की.... !" 

मी दोन घेतले. दोघांसाठी वेगवेगळे. तिने केसात माळला आणि मी खिशात ठेवला...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा