नाटक लागतंच मला..
अन्न, वस्त्र, निवारा यांबरोबर असणारी ही एक मूलभूत गरज आहे माझी..
कधी खूप frustrate झालो, निराश झालो ना, तर त्यावर 'नाटक' हा एकमेव उपाय असेल..
प्रत्येक खोलीला एक Exhaust Fan असतो ना, तसं नाटक आहे माझ्यासाठी..
कारण, आजूबाजूला घडणाऱ्या, घडून गेलेल्या किंवा घडू पाहणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर माझ्या आतून एक Reaction येत असते.. आणि ती खूप Strong , Ultimate असते..
तिला बाहेर पडायला मग एकच मार्ग उरतो.. नाटक....
मग एखाद्या व्यक्तिरेखेत मी जातो आणि स्वतःच्या आत साठवलेलं सगळं तिच्यापाशी मांडून मोकळा होतो..
कधी भांडतो तिच्या मार्फत, कधी रडून घेतो ढसाढसा, कधी खूप खळखळून हसतो, तर कधी शांत बसून स्वतःचा शोध घेत राहतो, तिच्या मदतीने..
व्यक्तिरेखा खरं आपल्या आतच असते.. आपल्या आत आपल्याला ती शोधता आली, म्हणजे मिळवलं... पण ती मिळेपर्यंत तगमग चालू असते.. अक्षरशः पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी..
ती अर्थ देते माझ्या अस्तित्वाला, खरा आणि मला आवडतो तसा...
म्हणून हवी असते कायम ती सोबत..
आणि म्हणून हवं असतं नाटक सोबत...
फार अपेक्षा नाही माझी..
पण नाटक...
लागतंच मला....!
- आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा