शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

Present

 काही जाणीवा खोल जपल्यात आत कुठेतरी, तुझ्याबद्दल....

तुझा एक 'हॅलो' देखील काळजाचा ठोका चुकवत असे...
अशा खूप आत साचून राहिलेल्या गोष्टी, घडल्या तशा, मोकळेपणाने कोणालाच नाही सांगत आपण.. 'स्वतः' सोडून.. कारण दुसरं कोणी त्यात आलं की 'सापेक्षता' येते त्या गोष्टीला.. तसं नको असतं आपल्याला.. कधी कधी ती गोष्ट फक्त आहे तशी, किंवा घडल्ये तशीच accept करणारं कोणीतरी हवं असतं.. त्यावर काही react न करणारं, suggestion न सांगणारं, त्याला विरोध न करणारं असं कुणीतरी हवं असतं.. हा acceptance किती महत्वाचा असतो ना ! नाहीतर ती गोष्ट सतत टोचत राहते, एक काटा आतमधे राहिल्यासारखी !  आपणच आपल्याला शिकवत असतो.. "accept करायचंय, accept करायचंय..." मग तो काटा विरघळून जातो.. एकदा का हा काटा विरघळून गेला, की मग त्या जपलेल्या जाणीवेचं दुःख होत नाही.. झालेली गोष्ट उपटून काढून तर टाकू शकत नाही आपण.. पण ती किमान निरुपद्रवी करू शकतो... 
तू छान होतीस, पण माझा present तर वाईट / कुरूप नाहीये ना ! ही जाणीव मग बाळसं धरू लागते..! आणि मला माझा present आवडू लागतो.. जितकं मी present मध्ये राहतो तितकं मला तुझं नसणं accept करणं सोपं होऊन जातं..  
ते कुणीसं म्हटलंय ना, 
"Yesterday is a history, tomorrow is a mystery, but today is a 'gift' ! Hence it is called as 'Present' !!! " 

- तोषा....
( Ashutosh Amod Purohit )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा