शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

Possessiveness

 ...... अगदी या या pic ला "caption" काय आहे, इथपासून तुझी सगळी फेसबुक वॉल जवळ जवळ पाठ असते मला.. तुझ्या प्रत्येक फोटो मधल्या तुझ्या poses माझ्या नजरेने सेव्ह करून ठेवलेल्या असतात.. पुन्हा पुन्हा तुझ्या टाईमलाईन वरचे फोटोज बघताना लेफ्ट ला स्क्रोल केल्यावर कोणता फोटो येणारे हेही पाठ झालेलं असतं..

तरी त्यातल्या त्यात मला सगळ्यात आवडतो तुझा लिहितानाचा फोटो.. खूप intensely विचार करत तू खिडकीबाहेर बघत्येस, शेजारच्या कॉफीच्या कपमधून वाफा येतायत.. तुझ्या हातातलं पेन आता कधीही कागदावरून धावायला लागेल अशा उत्कट मोड मधे, तुझ्या बोटात उभं आहे..
"इतका कसला विचार करत्ये ही?" असा प्रश्न पडतो, पण तो तुला विचारावासा वाटत नाही, इतकी तंद्रीत असतेस..
त्या तंद्रीचाही मग मोह होतो मला..

ए तुला मी खूप possessive वाटतो का तुझ्याबद्दल ?
कारण, मी असं काही बोललो, की तुझी नजर त्या खिडकीबाहेर बघणाऱ्या फोटो मधल्या नजरेसारखी होते... अथांग विचारात गढलेली..
असेनही may be मी possessive तुझ्याबद्दल.. पण माझं तुझ्याबद्दल हे possessive असणंच आवडतं तुला असं तूच म्हटली होतीस ना ! की तो फक्त पहिल्या प्रेमाचा भर होता..? मग मी समजायचं काय नक्की ?

तुझ्याबद्दल हा सगळा विचार करताना माझाही चेहरा नकळत तुझ्यासारखा झालेला असतो.. अथांग विचारात गढलेला...
अन् तूही मग मला निरखत राहतेस...
माझ्या तंद्रीचा मोह करत, काहीतरी लिहण्यासाठी....!

- तोषा....
(Ashutosh Amod Purohit) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा