स्वतःचे problems काही काही वेळेला मनापासून कुरावाळायला आवडतात आपल्याला.. आणि मग त्या प्रॉब्लेम च्या दुःखात असण्याचा एक comfort zone तयार होतो.. अपयश, दुःख प्रत्येकालाच आहे ना ! काही काही वेळेला ते स्वतःकडून अति अपेक्षा ठेवल्यामुळे देखील होत असतं.. बऱ्याचदा स्वतःला नीट ओळखत नाही आपण.. आणि मग अवाजवी अपेक्षा ठेवतो स्वतःकडून..
कोणीही इथे 'Perfect' म्हणून जन्माला आलेलं नाही.. किंबहुना अपूर्णत्व असतं म्हणूनच तर जन्म प्राप्त होतो ! आपण पूर्ण होण्याच्या process मधे आहोत.. पण हे विसरून जाऊन आपण स्वतःवर त्या पूर्णत्वाच्या definitions लादत बसतो काही काही वेळा, आणि मग दुःख करत बसतो, स्वतः कडून अपेक्षाभंग झाल्याचं.. माणूस दुसऱ्याकडून अपेक्षाभंग झाला तर एकवेळ त्याला माफ करेल, पण स्वतःकडूनच झाला तर स्वतःला माफ करणं त्याला कठीण जातं... याचं कारण ममत्व ! आपल्याला सगळ्यात जास्त ममत्व स्वतःबद्दल असतं.. जितकं ममत्व जास्त, तितक्या अपेक्षा जास्त आणि अपेक्षापूर्तीचं compulsion जास्त !
थोडं स्वतःला समजावलं पाहिजे, की झाल्या गेल्याचं दुःख आपल्याला नाही करायचंय... "Its okay !" असं म्हणून थोडं सोडून द्यायचंय.. आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःत कितीही flaws असले, चुका झालेल्या असल्या, काहीही असलं तरी स्वतःला माफ केलं पाहिजे.. स्वतःला माफ केलं नाही तर या guilt मधून बाहेर येणं कठीण होऊन बसतं आणि माणूस उन्नतीच्या दिशेने जाऊ शकत नाही..
प्रामाणिक प्रयत्न आपल्या हातात आहेत, ते आपण करूच, करतोच आहोत, पण काही अपरिहार्य कारणांमुळे त्यात थोडी कमतरता राहिली तर लगेच स्वतःवर attack करायला जाऊ नाही... स्वतः ला अति judge करू नये, आहे ती परिस्थिती accept करायला शिकलं पाहिजे..
"It's okay, not to be OK !" असं म्हणायला शिकलं पाहिजे... !
- तोषा....
(Ashutosh Amod Purohit)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा