शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

शून्यत्व ते एकत्व

 काही नसतं बोलावसं वाटत बऱ्याचदा... उगाचच !

स्वतःच स्वतःला अनुभवत असतो आपण...
कसली ओढ पण नाही आणि कशाचा त्रागा पण नाही...
आपण नुसते 'असतो'... किती सुंदर असतं ना, हे असं 'नुसतं असणं' ! खरंतर या सगळ्या शब्दांचीही गरज नसते त्यावेळेला.. काहीच क्षण असतात दिवसभरातले असे... पण जे असतात ते मोहक असतात.. मला माझी पात्रं या क्षणांमध्येच भेटतात.. कारण कोणतेही शब्द नसतात तेव्हाच त्या पात्रांचं 'असणेपण' जागृत होतं आणि मला येऊन भिडतं... मला नसतं माहिती, की आता मी काय लिहणार आहे... नुसता evernote उघडून बसलेला असतो 5-10 मिनिटं... शून्यात बघत बसल्यासारखा...
पण काहीही असो... त्या पात्रांचं एकदा का दर्शन झालं की त्या शून्यत्वाला अर्थ येतो... त्याचं एकत्वात रूपांतर होतं...

तेव्हा कवी सुधीर मोघेंच्या ओळी आठवतात...
" लय एक हुंगली खोल खोल श्वासात...
ओवीत चाललो, शब्दांच्या धाग्यात...
लगडला वेल, तो पहा निघाला गगनी...
अन् देठांना फुटल्या, कविता पानोपानी !!"

- तोषा.....
(Ashutosh Amod Purohit)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा