शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

आपलं मन

 किती स्वतःच्याच चष्म्यातून जग पाहत असतो आपण.. Interpretations असतात आपली, समोरचा आपल्याबद्दल मनात काय विचार करतोय याची.. मग ती Interpretations हळूहळू पक्की करत जातो आपण.. कारण समोरच्याचा प्रश्न नसतो, आपल्यालाच स्वतःविषयी ते तसं पक्कं वाटत असतं.. म्हणजे जे समोरच्याला आपल्याविषयी वाटतंय असं आपल्याला वाटत असतं, ते खरंतर आपल्यालाच आपल्याविषयी आतून वाटत असतं.. कसला solid गोंधळ आहे ना !

मग कधीतरी असंच फाडकन बोलून मोकळे होतो आपण की, "तू का असा विचार करतेस माझ्याविषयी?" 
पण त्या व्यक्तीला याचा काही गंधच नसतो ! मग आपल्या लक्षात येतं की हा तर सगळा आपल्याच मनाचा गोंधळ होता.. मग तोंडावर पडल्यासारखी situation होते आपली.. 
मग असं मनात येतं, " काय करायचंय समोरच्याचं इतकं मनात घेऊन, किंवा त्याचा इतका विचार करून ?" 
पण आपण समोरच्याचा विचार करत नसतोच.. आपण फक्त आपलाच विचार करत असतो आणि सुखी किंवा दुःखी होत असतो.. 
आपलं मन खूपदा जवळच्या relations बद्दल हे करत असतं.. Interpretations वगैरे.. लांबच्या माणसांच्या बाबतीत किंवा ज्यांचा आणि आपला फार जवळचा संबंध नाही अशा लोकांच्या बाबतीत मन तितकंसं interprete करत नाही, किंवा त्या interpretations ना तितकंसं महत्व देत नाही.. कारण त्या लोकांबद्दल मन possessive नसतं.. जवळच्या माणसाला आपलं काहीतरी खटकलं, म्हणजे खरंच आपलं काहीतरी चुकलंय हा feel मनाला येतो आणि तो त्याला नको असतो..
म्हणून मग आपलंच कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्याची अनावश्यक धडपड सुरू होते.. 

'सायास करिसी प्रपंच दिननिशी । ' याचा अर्थ आणखीन काय असणार ? 

तुमच्या बाबतीत झालंय असं कधी..??

- तोषा...
(Written by Ashutosh Amod Purohit )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा