शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

स्वातंत्र्य

 असं एकट्यानेच कधीतरी दूरवर कोणालाही न सांगता जावं.. कुठल्यातरी नदीच्या काठावर किंवा एखाद्या निवांत झाडाखाली किंवा कुठल्याही शांत मंदिराबाहेर... आपल्याला एक व्यक्ती म्हणून आयुष्यात असलेलं स्वातंत्र्य मोकळेपणानं अनुभवता येतं तिथे.. आणि तुमच्या लक्षात आलं का ? मगाच्या वाक्यात मुद्दाम मी 'मंदिराबाहेर' असं म्हटलं... 'मंदिरात' असं नाही म्हटलं.. कारण मंदिरात मला देव जितका सापडतो, त्यापेक्षा जास्त मंदिराच्या बाहेरच्या शांत आवारात सापडतो.. ते बाहेरचं तुळशी वृंदावन, कळसाची अंगणात पडलेली समाधिस्थ सावली.. त्यांच्यात मुरलेल्या शांतीमधून तो अनुभवता येतो.. मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती असते त्याची... पण ज्याप्रमाणे एखादी अतिशय आवडती खाजगी गोष्ट उघडपणे बोलण्याऐवजी गुप्तपणे प्रगट करायला आपल्याला अधिक आवडते,

तसंच देव या शांतीतून गुप्तपणे प्रगट होत असतो.. 

तो अनुभवता आला की आपलं खरं खरं व्यक्ती स्वातंत्र्य आपण अनुभवलं असं म्हणता येईल.. 
आयुष्यात आपण काहीतरी मिळवलं याचं समाधानही यातूनच मिळेल... 

- तोषा....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा