शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

Focus...

 "मी देईन आधार तुझ्या वृध्द आई-बाबांना... काळजी नको करूस.." एक मित्र दुसऱ्या मित्राच्या खांद्यावर आधाराचा हात ठेवत म्हणतो.

पहिला scene संपतो... दुसऱ्या scene ची सुरूवातच त्या वृध्द आजी-आजोबांपासून होते. scene च्या अगदी सुरुवातीला camera चा focus पडतो, तो त्यांच्या काठीवर...! का बरं ? काठीवरच का ? direct त्यांचा चेहराच दाखवला असता तर?...
गंमत अशी आहे, की पहिल्या scene चा शेवट हा वृध्दांना आधार देणाऱ्या आश्वासक वाक्याने झालाय..
ते वाक्यच 'काठी' बनून आपल्याला दुसऱ्या scene मधे भेटतं..! camera असंच खूप काही सांगत असतो आपल्याला... शितावरुन भाताशी ओळख करून देण्याची ताकद असते त्याच्याकडे...!
त्याचा focus ज्याच्यावर असतो ना, ती गोष्ट आपल्याशी बोलत असते खरंतर...!
पुढे त्याच scene मधे वृध्द आजी कपाटातून ज्ञानेश्वरीचं पुस्तक काढतात... त्यावरची धूळ झटकतात..  त्या झटकलेल्या धूळीचे कण खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशाने उजळून निघतात... आणि अचानक कॅमेरा चा focus त्या धुळीच्या कणांवर जातो... का??
कारण त्या धूळीच्या कणांमधून हे प्रतीत होतं, की त्या घरात गेले कित्येक महीने ज्ञानेश्वरीला कोणी हातच लावलेला नाही...!!! यावरून त्या घरची संस्कृती लख्खपणे डोळ्यांसमोर उभी राहते...आजवर त्या घरातल्या एकाही व्यक्तीला ज्ञानेश्वरी हातातही घेऊन पाहावीशी वाटली नाही ? किंवा त्यांना तसा वेळ झाला नाही.
मग का झालं असं ? का नाही झाला वेळ ? का नाही झाली इच्छा ?
आणि आत्ताच अचानक आजीलाच का आठवण यावी ज्ञानेश्वरीची ?
... आणि या सगळ्याची उत्तरं शोधण्यासाठी आपण तो cinema पाहत राहतो. camera तुमच्या cinema ला 'खोली' प्राप्त करून देतो, असं मला वाटतं.
मग आता तिसरा scene कुठे सुरू होईल ?
कदाचित त्याच घरातल्या अशा एखाद्या खोलीत, जिथे आजवर त्या घराला ज्ञानेश्वरीची आठवण का आली नाही, याचं उत्तर आपल्याला मिळतं.
असं करत करत scenes ची माळ तयार होते आणि cinema घडतो.. किंबहुना, camera चा focus तो 'घडवतो'..!
आयुष्यात तरी दुसरं काय आहे ?
After all, 'FOCUS' matters...!!!

-आशुतोष पुरोहित 😎😃

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा