हवं असतं कोणीतरी....
दिवसभराचं दमणं रिचवण्यासाठी हक्काने कुशीत शिरणारं.. हवं असतं कुणीतरी...
" जेवलास का?" "झोपलास का?" "थांब ना.." "बोल ना माझ्याशी.." हे सगळं म्हणणारं...
हवं असतं कुणीतरी...
नुसतं "कशीएस ? - मस्त " इतक्यावरच न थांबता, "अजून बोल ना.." असं म्हणत आपल्यासाठी जागं राहणारं..
हवं असतं कुणीतरी...
"कोणाशी बोलत होतास इतका वेळ?" असं विचारत आपल्या वेळेवर हक्क दाखवणारं....
हवं असतं कुणीतरी...
एखाद्या रात्री चांदण्यात फिरताना.. हात हातात धरायला...
हवं असतं कुणीतरी...
एखाद्या संध्याकाळी.. कविता ऐकवायला...
हवं असतं कुणीतरी...
आयुष्याच्या गाण्याचा.. ठेका धरायला...
हवं असतं कुणीतरी..
हवं असतं कुणीतरी,
आपले लाड पुरवायला..
हवं असतं कुणीतरी,
आपला तोल सावरायला..
खरंच...
आपल्यासोबत जगायला....
हवं असतं कुणीतरी....
- अशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा