शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

महत्व

 कोणाला किती महत्व द्यायचं याची काही गणितं नकळत बांधलेली असतात आपण आपल्या मनात..

अगदी ती व्यक्ती भेटल्यापासूनचे क्षण आपलं मन टिपत राहतं.. ती टीप, त्या माणसाच्या account ला जमा होते आपल्या मनात.. अशा अनेक क्षणांच्या साठवणीचं, त्या व्यक्तीचं, असं आपल्याच मनातलं account ! 
कधी बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार होत राहतो आपल्याच भावनांचा त्या account मधे.. सारं काही आपलंच.. Predictions आणि interpretations सकट सगळं सगळं फक्त आपलंच.. त्या व्यक्तीला बऱ्याचदा त्याच्याशी काही घेणं-देणंही नसतं.. त्याचं account बुडो, नाहीतर भरून वाहो ! त्याचं त्या माणसाला काहीच नसतं..
झालीच कधी वजाबाकी विश्वासाची, तरी तेवढ्या "interest rate" ने "विश्वास" , account मधे पुन्हा जमा होईल याची शाश्वती काय ?
पुन्हा सारी चिंता आपल्यालाच..!
खरंच समोरच्याला काहीच पडलेली नसते ना, आपल्याला काय वाटतं त्याच्याबद्दल याविषयी...!

मग विचार केला,
मी तरी असा किती वेळा माझा account balance चेक करून पाहिलाय...? इतरांच्या अंतरात डोकावून...??

आजपासून ठरवलंय...
काहीही झालं तरी balance maintained ठेवायचा...
नाहीतर सारंच "imbalance" व्हायचं !!
अगदी आयुष्य सुद्धा !!!!

-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा