नवा जन्म घ्यावा, असं प्रत्येकाला कधीनाकधीतरी वाटतंच.. पुन्हा व्हावं नवं बीज, रूजावं नव्या मातीत.. नवं शरीर, नवा अंकुर, नवं ताजेपण.. यातलं 'नवेपण'ही नवंच असावं आपल्यासाठी....!! खरंच असा नव्याने जन्म घेता येईल का?? .. अडचण इतकीच येते.. की आत्ताचं आपलं, 'जुने'पण, 'साचले'पण टाकता येत नाही सहजासहजी, त्याचा कितीही त्रास होत असला तरी....!!!
कमाल आहे ना??
जुगलबंदी चालू असताना, गायकालाही असंच वाटतं, की समोरच्या गायकापेक्षा नवा आणि अधिक भिडणारा असा कुठलातरी लपलेला सूर आपल्याला गवसावा..!
पण जुनी सुरावट विसरता येत नाही, आणि मग नवा गवसलेला सूरही अनोळखी वाटायला लागतो...!!!!
'एकाच या जन्मी जणू, फिरुनी नवी जन्मेन मी' हे होऊ शकतं, फक्त मागचं थोडं विसरायची कला आपल्याला आली पाहिजे... बस..!
- आशुतोष 😉😊😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा