शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

थेंबांचे टपाल

 कुठे पावसाळी सर, आणी आनंद लुटून !

कुठे मोहर मातीचा जाई सुगंध देऊन !

पानापानावर जन्मे एक मोती इवलासा !
स्वच्छ अंघोळ सृष्टीला, घाली नभ सावळासा !!

नदी, झरे, तलावही ओसंडती आनंदाने !
कोकीळेला सूर मिळे, अवचित पावसाने !

सृष्टीच्या या संसाराचे रूप देखणे कमाल !
बावरल्या मना आले, जणू 'थेंबांचे टपाल' !!!

-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा