शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

वादळवाट

 कुठे वाळूत चालला, औटघटकेचा खेळ...
कुठे पानावर येई, दंव सहज निर्मळ...

कुठे भंगल्या रात्रींच्या, आठवणी भिंतीवर...
कुणी मनात जपतो, गुपितेही खोलवर...

कुणी धावते धावते, प्रकाशाच्या वाटेवर...
कुठे 'सहज' उठते, मुक्या रात्रीत काहूर...!!

कुठे कमाल रंगतो, आयुष्याचा सारिपाट...
कुणी अंतरात चाले, एक सुनी वादळवाट... !!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा