शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

साजूक पावित्र्य

 भिजे चांदणे पाण्यात, त्याचे टिपूर लाजणे...
फुले रातराणी ओठी, तिचे सुगंधी बहाणे...

सुख ओवले फुलात, त्याचे सजले तोरण...
सुख दळून घेतले, सरे दुःखाचे कांडण..

शांती रांधते घरात, तृप्त तृप्त ताट, पाट...
रानीवनी रूणझुणतो, मंजुळसा किलबिलाट..

दिस थकतो, भागतो, दिवेलागणीच्या वेळी..
शांत निजतो; तयाच्या, गाभाऱ्यात सुरावळी...

-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा