तो बसस्टॉप वर तिची वाट बघत होता.. स्टॉपच्या छपरावरून ओघळणारे थेंब मोजत होता.. "संध्याकाळ दाटून आल्ये.." तो मनाशी म्हणाला. काही रिमझिम धारा बरसू लागल्या होत्या.. दिवसभराचा शीण घालवण्यासाठी दोघे भेटतात. मग तीच त्याला घरी सोडते ! रोजचा ठरलेला क्रम. तिचा आवाज ऐकला कीच त्याला उत्साह येतो. उमेद येते नव्याने काम करण्याची..
"ती"ही थाटात येते , अगदी भाव खात ! आपल्यासाठी कोणीतरी वाट बघतय म्हटल्यावर रुबाब आपोआप वाढतो ना माणसाचा..
तरीही तिची वाट बघण्यात त्याला खूप आनंद वाटतो. तिची वाट बघणं हीच एक धुंदी आहे असं वाटतं त्याला..! मग प्रत्येक वेळी ती येत्ये का हे पाहत असताना, येणाऱ्या प्रत्येकात त्याला ती दिसायला लागते..
Yessss आलीच...!! तो चष्म्यावरचं पावसाचं पाणी पुसत पाटी वाचतो....
" 55 नंबर सनसिटी " !!!
तो आनंदाने चढतो.. तीही मग लक्ष्मी रोड वरून थाटात जायला लागते..
काय romance आहे नं दोघांचा !!
तशात पाऊस.... !!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा