नाती ! किती गंमत असते ना या नात्यांची !
जरा ओबडधोबड असतात कधीकधी.. पण रेखीव नक्षी
जन्म
आपणच नटवायच नातं, स्वतःसाठी...
कसंही असू दे ते, सजवायचं आपण.. स्वतःसाठी..
थोडं तुटलं असेल एका बाजूने.. असू दे.. जरा खुबीने छिन्नी मारली की तो तुटलेला भागही नवा अर्थ घेऊन उभा राहील दिमाखात ! छिन्नी मारण्याचे कष्ट घेऊया ?... स्वतःसाठी...?
आपणच नातं जगवायचं... स्वतःसाठी...
नसेल भरली कधीतरी त्याच्या पोटाची खळगी, तर आपण भरवायचे चार घास.. पण अनुशापोटी नाही ठेवायचं त्याला... खायला प्यायला घालायचं भरपूर ! स्वतःसाठी....
जग काय म्हणेल याचा फार विचार नाही करायचा... कुणीसं म्हटलंय, "इंसान अपनी नजर में सही होना चाहिये... दुनिया तो क्या ! भगवान सेभी दुखी है !!"
आपल्या नात्यावर आपण जग ओवाळून टाकायचं...
स्वतःसाठी...
सारा सारा अट्टाहास स्वतःसाठी...
कारण आपण छान आयुष्य जगणं ही गरज आहे.. आपल्या नात्यांसाठी !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा