दोन शब्दांच्या मध्ये जेव्हा प्रेमाचं नातं निर्माण होतं, तेव्हा ते दोन शब्दसुद्धा 'ओळ' बनून जातात ! त्यांचं 'वाक्य'पण निघून जातं.. त्यांना एक ओलावा येतो.. म्हणून ओळ ही कवितेची, पत्रातली असते आणि वाक्य हे लेखाचं, पुस्तकातलं असं असतं..
आपल्या जगण्याला सुद्धा एक 'प्रेमाची ओळ' असावी लागते नाहीतर ते उदास वाटायला लागतं.. 'तटस्थ वाक्य' बनून जगण्यात फार मजा नसते.. एखाद्या फुलझाडाच्या भोवताली कसं त्याचं एक आळं असतं, त्याने राखलेलं, जपलेलं! तशीच आपल्या आयुष्याची 'ओळ' ही आपण जपायची असते..!
ती आपल्याच मनात घर करून बसलेली असते.. ती एकसंध असते, निखळ असते ! आपणच ती कधी कधी विसरून जातो...
जगायचं असतं ते त्या 'ओळी'साठी..!
चला तर मग शोधूया आपल्या आयुष्याची ओळ नक्की कोणती आहे ते..!
तिलाच विचारुया, 'ती सध्या काय करते..?' ते ..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा