"ती सध्या काय करते..." या विषयावर मी 4 लेख लिहिले.. तरीही "ती सध्या काय करते..?" या चार शब्दांमधलं कुतूहल काही संपत नाहीये.. अजूनही हे 4 शब्द सतत खुणावतात.. पोटात आणखीन काहीतरी असल्यासारखे...!
"ती सध्या काय करते.." यामधली "ती" ही not necessary एखादी मुलगीच असेल.. "ती" म्हणजे आपल्या आयुष्यातली अशी कोणतीही गोष्ट जी आठवल्यावर आपल्या चेहऱ्यावर नकळत एक smile उमटतं.. ती आत्ता आपल्यासोबत नाही याचं दुःख नसतं त्यावेळी.. असते ती फक्त तिच्या आठवणीची धुंदी..! पुन्हा मागे जावंसं वाटतं.. तो काळ , ते क्षण अनुभवावेसे वाटतात.. पण आता तर ते शक्य नसतं..
आपण पुन्हा वर्तमानात जगायला लागतो.. त्या धुंदीतून बाहेर येतो... पण त्या धुंदीचीही आठवण सतत मनाला होत राहते...! आणि मग नकळत आपलं मन "ती"ला वर्तमानात आणण्याचा प्रयत्न करू लागतं...!
म्हणू लागतं.....
"खरंच, काय करत असेल ती सध्या....?"
- आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा