शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते..

 तो petrol pump पाशी आला. 0 reading बघून त्याने 500 रुपये माणसाच्या पुढे केले.


"500 चं करा.." 


Pump च्या रेडिओवर अरजित सिंग गात होता.. "की मैं तुझे कितना चाहता हू, ये तू कभी सोच ना सके.." 


तिला खूप आवडतं ना हे गाणं.. त्याला एकदम strike झालं. 

-------

"आज येताना माझ्यासाठी गजरा आणायचा हं.."


" हो मॅडम.. कसं विसरीन मी..! Bye! Will miss you dear.." तिच्या कपाळावर ओठ टेकवून तो officeला गेला..

------

काय सुरेख आणि प्रेमळ संसार होता नाही आपला..

लग्ना होऊन  बरीच वर्षं झाली की प्रेम कमी होतं म्हणायचं की matured झालंय म्हणायचं..?

काल कसे भांडलो तिच्याशी.. चुकलंच यार.. आपल्यामुळेच तिच्यातलं एक गोड फूल कोमेजत चाललंय का ? तिला सांभाळता येत नाहीये का आपल्याला..? 


" साहेब गाडी जरा पुढं घ्या नं, मागं थांबलयेत लोकं.." 


तो दचकून भानावर आला.. समोर गजरेवाली थांबली होती.. 

आपण आणू शकू का तिच्यातली "ती" परत..? त्याने चटकन एक गजरा विकत घेतला आणि तिला फोन लावला..


"हा कधी येतोयस रे..?" तिनं प्रेमानं विचारलं..


"ती" सध्या काय करते गं..?" त्याने गजऱ्याकडे पाहत विचारलं.. 


"काय..?" 


" आल्यावर सांगतो.." 


त्याने फोन ठेवला.. आज माळूचया गजरा तिच्या केसात.. अनुभवूया जुने क्षण.. 

बघूया.. आपल्याच "ति"च्यातली "ती", सध्या काय करते ते.....


-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा