काल यतिन दादाचा group वर msg आला आणि मी भारावून गेलो. आपल्या लिखाणात कोणीतरी इतकं interest घेऊन, हक्काने काहीतरी सांगतय, ही कल्पनाच माझ्यासाठी खूप छान होती. म्हणजे, आत्तापर्यंत माझ्या लिखाणाचं कोणी कौतुक केलं नाही, किंवा मला exposure मिळालं नाही वगैरे असं काही नाही.. पण,
"उद्यापासून तू रोज नवीन काहीतरी लिहायचं आणि ते compulsory आपल्या group वर टाकायचं... its my order " या हक्काने कोणी जवळीक साधली नव्हती.
" रोज नवीन कसं काय काहीतरी सुचणार ?" या विचारात गादीवर अंग टाकलं. झोप कधी लागली कळलं नाही. तसंही ते कधीच कळत नाही. कमाल आहे ना ? माणसाला आपण जागे कधी झालो हे कळतं, झोपलो कधी कळत नाही.. !
पण माझ्या डोक्यावरच्या चंद्राला कळलं असेल. कारण, मी गादीवर पडलो की तो माझ्याकडे टकमक बघत बसतो, शेजारच्या खिडकीतून.. एवढं माझ्यात पाहण्यासारखं काय आहे त्याचा तोच जाणे..
सकाळी उठलो.. (सगळेच उठतात !) आवरून कॉलेजला निघालो.. डोक्यात एकच विचार.. 'नवीन काहीतरी सुचायला हवं'.
हे नवीन सुचतं म्हणजे exactly काय होतं? डोळ्यांसमोर आपसुकच घडलेला एखादा प्रसंग, घटना, किंवा दृश्य, अचानक, 70 mm च्या त्या चंदेरी पडद्यावर 'screen' झाला, तर काय माहौल तयार होईल !! अशी वीज डोक्यात चमकून जाते.. किंवा घरात general गप्पा चाललेल्या असतात.. पण त्यात मधेच, असं एखादं वाक्य येऊन जातं, की ते वाक्य, त्या गप्पांचा संदर्भ विसरून स्वतंत्रपणे डोक्यात घुमायला लागतं.. असं पटकन वाटून जातं, की हेच वाक्य रंगभूमीवरून प्रेक्षकांनी ऐकलं तर त्यायोगे किती "वाह् " प्रसवतील !!!
नवीन कलाकृती घडते, ती रसिकांची दाद रिचवण्याच्या भुकेपोटीच...!
पण तो 70 mm चा पडदा काही डोळ्यांपुढून जात नव्हता... त्या पडद्याची पात्रता खूप उच्च आहे. त्यावर जे दाखवायचं, त्याचाही दर्जा तेवढाच हवा !
विचार चालू होते... शोध सुरू होता..
शोध अजूनही सुरू आहे..
नवीन काहीतरी मिळवण्यासाठी...
नवीन शोध सुरू करण्यासाठी...
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा