शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते...

 तो दरवाजा उघडून आत आला. Airport च्या waiting रुम मधल्या परिटघडीच्या वातावरणात त्याला जरा अवघडल्यासारखं होत होतं.... विमान यायला अजून 3 तास तरी होते.. बाहेरचं वातावरण जरा ढगाळ झालेलं.. या अशा वातावरणात ना, आधी आठवणी बरसतात आणि मग पाऊस..! 

पाकिटात किती पैसे आहेत हे एकदा चेक करावं म्हणून त्याने पाकीट उघडलं. आतून "Happy Birthday" चं sticker डोकावत होतं.. तसं खरं ते नेहमीच डोकावायचं.. तो १२वीत असल्यापासून त्याने ते जपून ठेवलं होतं... 


फार गोड होती ती.. तिच्याशी लग्न करावं, असं नाही वाटलं त्याला कधी ; पण तिचं असणं खूप सुखावून जायचं त्याला.. हे तिचं 'असणं' त्याने असं पाकिटात जपून ठेवलं होतं गेली कित्येक वर्षं.. 

इतक्यात बायकोचा फोन आला.. 


" ..... हो हो पोहोचलो airportला.. बसलोय इथे आत.. Take off च्या आधी msg करतो.. 

.... bye"


त्याने फोन ठेवला आणि त्याच्या मनात एक विचार चमकून गेला, 

"ती हल्ली 'असा' फोन कोणाला करत असेल..? "


त्याच्या मनात एकच प्रश्न , " ती सध्या काय करते..?" 

.....आणि तशात पाऊस...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा