एकाच घरात राहत असून, लोक WA वर बोलतात..
क्षणाक्षणाला selfie काढून, इतरांना send करतात..
Internet ने केलेली जादू आम्हाला बुवा कळत नाही..
चष्मा लावूनही आम्हाला साधा msgही वाचता येत नाही....
कवळी नसलेल्या बोळक्याचा, आम्ही कसला selfi काढणार..?
हातात वेँधळी काठी ठरत नाही, smartphone कुठून ठरणार..?
msg type करण्यातच आमचा दीड दिवस खर्च होतो..
good morning मधल्या gm पेक्षाही "कराग्रे वसते" चा श्लोक अधिक भावतो..!!!
"4 bottle vodka" पेक्षा "एकच प्याला"च मस्त झिंगवतो...
भडक रंगाच्या mini skirt पेक्षा, नव्वारीचा रुबाब अस्सल वाटतो...!!
अर्थात् , हे सगळं मला वाटतं.. , जगाने मात्र बदलायला हवं...
अन् मीदेखील त्यांच्यासोबत काठी सावरत चालायला हवं..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा