शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते...



आज खूप दिवसांनी ९वी तला एक मित्र भेटला.. आम्ही शाळेत जाताना रिक्षात एकत्र असायचो.. भरभरून बोलला.. जुन्या जुन्या, भल्या-बुऱ्या सगळ्या आठवणी काढल्या.. घर आवरताना अचानक जुना album सापडावा ना, तसं झालं आम्हा दोघांचंही..
मन किती सहज जोडलं जातं ना past शी ! एक 'soothing comfort' असतो त्याच्यासाठी past म्हणजे...!
काय सुंदर होतो आपण लहानपणी..! एकदम सोप्पे होतो असं वाटलं.. आणि मग सगळं लहानपणच तरळून गेलं डोळ्यांसमोरून.. कित्ती काय काय धमाल केल्ये यार आपण.. कैक वेळा आईचा ओरडा खाल्लाय... मारही खाल्लाय..
खूप सहज असायचो नाही आपण ! भावंडांबरोबर केलेली मस्ती, शाळेतली मारामारी, मोकळेपणानं हसणं खिदळण, सगळं सगळं miss करतोय खूप...
आहे त्यात समाधान मानायचं असायचं म्हणून जास्त सुखी होतो बहुतेक...!
आणि हो! आणखीन एक अशी गोष्ट होती की जिच्यामुळे आपण आहोत तसं आपल्याला स्वीकारावं, असं लोकांनाही वाटायचं...
"निरागसता.....!!!"

...... कुठे असेल ती..? 
काय करत असेल ती सध्या....?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा