शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

ती सध्या काय करते....

 आजवर माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या आणि गेल्या.. प्रत्येकीची स्वतः ची अशी एक वेगळी छटा असते, लय असते.. आपल्याला ती दर वेळी साधता येतेच असं नाही, पण त्या त्या वेळी तो ठेका पकडण्यासाठी मर मर धडपडत असतो आपण.. 

आपल्या प्रत्येकाच्या मनात आपल्या होणाऱ्या बायकोविषयी काहीतरी imagination असतं..

आपण आपल्याच मनात स्वतः पुरती एक 'ती' घडवलेली असते, रेखाटलेली असते.. आणि मग आपल्या मनातल्या 'ती' ला आपण प्रत्यक्षातल्या 'ती'च्यांशी match करण्याचा प्रयत्न करतो.. अनेक धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करू लागतो.. कधी कधी यश येतं, तर कधी पदरी निराशा येते.. 


अशा सगळ्या गमती जमतीत, एक विचार कधीतरी मनात येतोच...


देवानं जी मुलगी माझ्यासाठी म्हणून बनवली आहे,

'ती' कुठे असेल...?


काय करत असेल ती सध्या......?


- आशुतोष पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा