शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

अनामिका

      * अनामिका *


आता आता ओझे झाले, काही अनवट श्वासांचे...

स्पर्श आता मुके झाले, निःस्पृह जाणीवांचे....


वेदना आता खुणावती, सुखाचे काहीे इशारे..

हुंदक्यातून रूणझुणते, जणू चांदणे हासरे...


मंद मंद दीप झाले, मंद मंद तारका...

तरी मैफिल जमविते, कोणी एक अनामिका...!!


-आशुतोष पुरोहित 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा