* अजूनही....! *
विरल्या श्वासांतही या, आठवांचे सुने धागे l
फुंकून प्राण तयात, स्मृतिपुष्प उमलते मागे ll
उमलुनी त्या आठवांचा, अश्रू ; मोती होतो l
जुन्या, सुक्या गुलाबाला, अजुनी सुवास येतो...ll
सायंकाळी गाभाऱ्यात, शुभं-करोति दरवळते l
अजून खरचटल्यावर, बटव्याची आठवण येते...ll
आठवे अजून सुरांना, ती गायकी गंधर्वांची l
अजून आस रात्रीला, पहाटेच्या पूर्णत्वाची ll
काळोखात अजून दडल्या, सुखाच्या अस्फुट रेषा l
अजून त्या कवडशांना, भेटीची वेडी आशा ll
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा