* ज्याची त्याची रीत..! *
कोठून येई हा वारा, पत्त्यांची मांड उधळते..
ती झुळूक मज "बेघर" मग ऐशी करून जाते..
अश्रूचा थेंब टपोरा, आठवणी वाहून नेतो..
माणसासही "माणूस"पण, तो ऐसे देऊन जातो..
हा शब्द पहा कवितेचा, मोजकेच बोलुनी जातो..
पण लाखाचा अर्थही, तो ऐसा सांगून जातो..
आभाळ नक्षीदार अवघे, क्षितिजावर खिन्न होते..
ते खिन्नपण क्षितिजाचे, "आयुष्य" शिकवुनी जाते..
तो सुंदर साजा चंद्र, चांदण्यात धुंद खुलतो...
रात्रीसही त्या काळ्या, तो ऐसा अर्थ देतो...
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा