रविवार, २४ जून, २०१८

Whatsapp Diaries 5

तू आयुष्यात यायच्या आधी काहीच charm नव्हता whatsapp बघण्यात... 

कॉलेज च्या ग्रुप वर आलेला एखादा महत्वाचा msg.. 
मित्राकडून आलेली परीक्षेची टाईमटेबल्स.. 
नाहीतर स्वतःचं उत्तम चाललंय हे सगळ्या जगाला दाखवण्याकरता करायचा स्टेटस अपडेट...
यापलीकडे काहीच attract करायचं नाही मला, whatsapp बघण्यासाठी... 

पण तू आलीस आणि तू 'कारण' झालीस माझ्या whatsapp बघण्याचं..... 
Notification Panel वरून सगळी Notifications एका click ने 'clear' करण्याइतक्या सोप्या नाही राहिल्यात गोष्टी आता...
सगळे आलेले msgs Notification Panel चा पडदा ओढल्यावर दिसतायत खरंतर...
खाली दिसणारा No. Of Msgs चा आकडाही Match होतोय...
पण उगाच असं वाटतं की त्या Notification Panel मध्ये एखादा msg मावत नसेल आणि म्हणून तो मला दिसत नसेल आणि तो msg तुझा असेल.... तर.....?

Whatsapp open करून मी स्क्रोल डाऊन करून बघतो..
नसतो आलेला तुझा msg....
मग मी तुझा चॅटबॉक्स ओपन करतो..आपले आधीचे msgs दिसतात...
मी, जिथे आपलं conversation संपलंय त्याच्याही खाली स्क्रोल डाऊन करत राहतो उगाचच....
स्क्रिन ताणला जातो, यापलीकडे काहीच होत नाही..
मी whatsapp मधून बाहेर पडतो... 
बाकीच्या आलेल्या msgs शी मला काहीच घेणं देणं नसतं खरंतर...
तुझ्या चॅटवर नवीन काही आलेलं नाही, इथेच माझं whatsapp बघून झालेलं असतं....

दर 15-15 मिनिटांनी हा खेळ खेळत राहतो मी... 
मग रात्री कधीतरी तुझा msg आल्यावर तुझ्याशी बोलताना, दिवसभर मी पण कसा busy होतो हे सांगत राहतो.. 
बोलता बोलता मधेच तू म्हणतेस,
Zop nai ali ?

मी मनातल्या मनात म्हणतो, तुला झोप येणं साहजिक आहे गं.. तू खरंच busy होतीस.. मी दिवसभर कशात busy होतो माझं मला माहिती..... मला कुठली झोप येत्ये..!

मी लिहतो, 
Nai ajun... Pan tula ali asel tar tu zop.... 

आता यानंतर तू झोपायला जाणार हे माहिती असतं मला.. 
म्हणूनच तू झोपल्यावर माझ्या मनोरंजनाची तरतूद म्हणून मी Earphones कानात घालायला लागतो... 

तेवढ्यात तुझा msg येतो...

Mala pan naai aliii.... Mi sahaj vicharla....

हे मला अनपेक्षित असतं... तरीही मी earphones कानातच ठेवतो...
गाणी ऐकत चॅटिंग केलं की गाण्याचा मूड चॅटिंग मध्ये उतरतो...
मी मुद्दाम कुठंतरी रोमँटिक गाणं लावतो... 

..... आणि आता सुरू होणारं चॅटिंग कधीच कधीच संपू नये असं वाटत असतानाच......

Lights जातात.... 
Wifi बंद पडतं आमचं...
माझ्याकडे नेट पॅक नसतो... 

Lights यायची 10 मिनिटं वाट बघून मी तुला text message टाईप करायला घेतो,

Lights gele.. Wifi gela... Udya bolu... Good night...

तो सेंड करणार तेवढ्यात lights येतात..
मी उत्साहाने whatsapp ओपन करतो..
पण माझ्या msgs वर माफक रिप्लाय याव्यतिरिक्त खूप काही स्वतःहून उत्साहाने तू msgs केलेले नसतेस.. 
मग मीच विषय वाढवण्याचा प्रयत्न करतो... 

Baki kay challay..? विचारतो... 
पण या कमनशिबी msg ला एकच tickmark मिळतो ! 

म्हणजे ?? Light गेले तेवढ्या वेळात ही नेट बंद करून झोपायला पण गेली...?  
मी हातात आलेली match गमावलेल्या प्लेयर सारखा whatsapp मधून बाहेर पडतो....

निराश मनाने गाणी ऐकत बसतो, इतक्यात माझ्या text msg ची tune वाजते.....
मी msg बघतो....

"Lights gele.... Wifi gela... Udya bolu... Good night......."

- आशुतोष पुरोहित
9763057283

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा