* Contacts Blocked *
तर फायनली सक्सेसफुल झालो आपण वेगळे होण्यात..
तुला काय वाटतं..?
Whatsapp वर ब्लॉक केल्याने आयुष्यातून delete करू शकतो ना एखाद्या व्यक्तीला आपण..?
हल्ली whatsapp च अधिराज्य गाजवतं म्हणा आपल्या मनावर..
मुस्कटदाबी करून एखाद्याला खोलीत कोंडून ठेवावं आणि आपण त्या खोलीला कुलूप घालून तिथून निघून जावं असं वाटतं एखाद्याला ब्लॉक केलं की...
त्याच्या मनाचा विचार न करता त्याच्यावर लादलेल्या अत्याचाराची ही virtual पद्धत...
पण मुळात त्रासच का व्हावा एकमेकांच्या असण्याचा इतका..?
माहिती असतं, या खड्डयात उडी मारल्यावर कुणीच झेलणार नाहीये आपल्याला, तरी तिथेच आंधळ्यासारखी उडी मारत राहायची आणि आपटून घेत राहायचं स्वतःला..
उडी मारताना मात्र असा अविर्भाव असतो आपला की, खाली माझा कुणीतरी खूप विश्वासाचा माणूस थांबलाय मला झेलायला...
जगाला काहीच फिकीर नसते तुम्ही धडपडलात किंवा काय, याची...
पण खड्डयातून कसंबसं बाहेर येतो आपण...
खरचटलेलं लपवत..
मुरगळलेलं सहन करत..
पण चेहऱ्यावर मात्र मुद्दाम हसू ठेवतो आणि असं दाखवतो जगाला जणू काही घडलंच नाही...
का इतकं खोटं वागतो आपण..?
मग ते नातं असं संपवताना त्या न झेलणाऱ्या व्यक्तीचा राग येत असतो, की झेलणार नाही हे माहिती असून उडी मारणाऱ्या स्वतःचा..?
मग आपण ते खड्डेच बुजवायला सुरुवात करतो..
पण मनात येतं, मुळात असं नातं संपवणच योग्य की पुन्हा तपासून बघणं योग्य...?
त्याला कळलंच नसेल का मी उडी मारणारे हे ?
म्हणून नसेल थांबला मला झेलायला खाली..
बरोबर... त्याची नाही चूक...
मीच उगाच वेड्यासारखी अपेक्षा करत राहिले...
एकदा त्याला सांगून किंवा जस्ट नुसती चाहूल देऊन उडी मारून बघूया....
नक्की येईल तो झेलायला मला....
* Contacts Unblocked *
ती विश्वासाने पुन्हा एकदा उडी मारते...
- आशुतोष पुरोहित
9763057283
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा