तू ऑफलाईन गेल्यावर मी मुद्दाम आपला चॅट ओपन करतो...
हळूच...
तुझे काही खास, मी स्टार मार्क केलेले msgs वाचण्यासाठी...
त्यावेळी नेट बंद ठेवतो..
नाहीतर हे भोचक whatsapp ! लगेच माझा 'last seen' दाखवतं तुला..
आपलं चॅटिंग संपल्यावरही मी पुन्हा कोणाशी बोलायला ऑनलाईन आलो होतो, असं तुला वाटेल आणि तुझ्या मनात शंकांचं काहूर माजेल.. असं मला वाटतं...
मुसळधार पाऊस बरसून गेल्यावर तो सहन केलेल्या एखाद्या शांत झोपलेल्या फुलापाशी जाऊन त्याला न्याहाळावं ना, तसं वाटतं मला, तू ऑफलाईन गेल्यावर तुझे msgs वाचताना...
आपल्या चॅटिंग मध्ये मला खरी मजा कधी येते माहित्ये ?
जेव्हा समोरून msg टाईप होऊन यायच्या आधीच, आपण अधीर मनाने आपलं म्हणणं पोहोचवं म्हणून टाइपिंग करायला सुरुवात करतो ना, तेव्हा...
ते खूप धसमुसळं चॅटिंग असतं..
धड वाचतही नसतो एकमेकांचे msgs आपण नीट...
पण पोहोचवायचं असतं ऐकमेकांपर्यंत आपल्या मनातलं.. अगदी आत्ताच...
एकदा असंच चॅटिंग करत करत पहाटेचे 4 वाजवले होते आपण...
काहीतरी deep विषय होता..
आणि त्यावर आपल्या दोघांचं deep discussion..
हे जेव्हा असं अमानवी वेळेपर्यंत चॅटिंग चालू असतं ना, तेव्हा ते खूप devoted असतं..
म्हणजे त्यावेळी फक्त ती दोन माणसं ऑनलाईन असतात...
अख्ख्या whatsapp च्या जगात फक्त दोन माणसं.. तीही फक्त एकमेकांसाठी...
तशी 1-1:30 वाजेपर्यंत असते वर्दळ बऱ्यापैकी whatsapp वर...
पण त्यानंतरही जे जागे, ते खरे 'दिलवाले' !!
झालेलं चॅटिंग पुन्हा एकदा वाचण्यात आणखीन एक फायदा असतो.. काही काही msgs नजरचुकीने निसटलेले असतात चॅटिंगच्या झंझावातात.. ते कळतात..
बऱ्याचदा आपलं चॅट असं परत वाचल्यावरच मला तुझ्या बोलण्याचे, smileys चे अर्थ कळलेत..
मुळात, जे खरं deep conversation असतं, त्यात फारसे smileys नसतातच..
कारण भावना व्यक्त करायला smileys च्या कुबड्यांची गरज राहिलेली नसते तेव्हा..
मग असाच कधीतरी आपलं 2-3 महिन्यांपूर्वीचं चॅट उघडून वाचू लागतो...
आपलं नातं कसं बहरत गेलं, ते दिसतं मला...
फार काही हाती लागत नाही.. पण पूर्वीच्या काळी कसं वहीतल्या पानांमधे मोरपीस ठेवायचे, तसं तुझ्या खास msgs वर एक स्टार मार्क करून ते माझ्या पोतडीत जपून ठवतो...
कायमचे स्मरणात राहण्यासाठी...
- आशुतोष पुरोहित
9763057283
👍
उत्तर द्याहटवा