300 Msgs from 17 chats...
घरचं wifi सुरू झाल्यामुळे, पावसासारखे msgs बरसू लागले.. group वरचे msgs ignore करता येतात.. पण जे personal वर येतात, त्यांना मात्र compulsory reply द्यायलाच लागतो.. नाहीतर समोरच्याला असं वाटतं, की msgs वाचून पण reply करत नाही !!! खरंतर घरी आल्यावर इतका दमलेला असतो, की reply देण्याइतकेही त्राण अंगात नसतात.. पण काही नाती जपायची असतात. काही emotions ना योग्य तो respect द्यायलाच लागतो..
Personal वर बोलणार्यांना कसं बसं गप्प करतो मग मी.. मनात नसलं, तरी एकदम मधेच "bye" किंवा "gn" असा msg करतो आणि नंतर खाली लिहितो, "udya bolu, sorry"...
मला स्वतःला फार खटकतं, माझं हे वागणं.. कारण मला असं कुणी एकदम तोडून बोललेलं नाही आवडत.. तरी मी मात्र वागताना असंच वागतो..
बऱ्याच गोष्टी या आपल्याला खटकत असूनही आपण करत राहतो.. स्वतःसाठी ! फक्त स्वतःचा विचार करुन, स्वार्थी होऊन !
लहानपणी शिकवायचे, "माणसाने स्वार्थी असू नये" !
पण मोठं झाल्यावर कळतं, की जगात वावरताना लहानपणी शिकवलेल्या अनेक गोष्टींच्या विरुद्धच वागतो आपण... किंबहुना, असं वागलं, कीच माणूस 'मोठा झाला', असं समजतात..!
कोणी कधी मोठं व्ह्यायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं...
पण कोणता msg कधी ignore करायचा, हे मात्र ज्याला त्याला नीट कळलं पाहिजे...
मग तो group वर आलेला असो किंवा personal वर!!!
एकमेकांच्या भावना जपल्या म्हणजे झालं, नाही का ??
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा