शनिवार, १० फेब्रुवारी, २०२४

निळ्या spot च्या प्रकाशात...

 दीनानाथ नाट्यगृह, पार्ल्याला प्रयोग होता.. माझ्या anchoring ला बराच वेळ होता, म्हणून wing मधे शांतपणे बसलो होतो, डोळे मिटून. जरा वेळाने डोळे उघडले तर, समोरच्या wing च्या वरती टांगलेला निळा spot माझ्यावर पडत होता... मी विचार केला, "याने माझ्यावर का बरं प्रकाश टाकावा?".. हसलो थोडासा मनातल्या मनात.. आणि सहज माझी नजर खाली गेली, तर माझ्या अख्ख्या झब्ब्यावर हा निळा रंग पहुडला होता.. असलं भारी वाटलं!! मला कळेना की, 'Wingमधे असणाऱ्या मला या stage वरच्या spotने प्रकाशझोतात का बरं आणावं?'

इतक्यात, stage वर चालू असलेल्या नाटकातल्या कुठल्याशा वाक्यावर कडकडून टाळ्या पडल्या आणि मी एकदम भानावर आलो..
भानावर आल्यावर माझ्या लक्षात आलं की, stage वर उभ्या असलेल्या पात्रावर हा spot प्रकाश टाकतोय.. म्हणजे, ते पात्रं हा त्याचा 'focus' आहे आणि त्या focus वरून माझ्यावर तो प्रकाश फक्त परावर्तित होतोय, म्हणून मी पण निळाशार झालोय...
प्रेक्षकांची दाद ही अशीच असते ना.... निळ्या spot सारखी... ती खरंतर मिळत असते आपल्यातल्या 'कलेला'...
आपल्याच उगाचच असं वाटत राहतं की, ती 'आपल्याला' मिळाली म्हणून...
गंमत आहे ना... !!!


-आशुतोष पुरोहित😉😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा