काही खरे पत्ते...
काही खोटे पत्ते...
काही पत्ते, 'खरे' असल्याचा खोटा माज असणारे...
तर काही पत्ते... मुळापासून निष्कलंक 'खरं'च राहण्याचा आटापिटा करणारे..
काही जुने पत्ते..
काही नवे पत्ते..
काही पत्ते... खेळून खेळून दमलेले.. जीर्ण शिर्ण झालेले..
तर काही... कोऱ्या पॅक मधून नुकतेच बाहेर काढलेले.. नवा खेळ मांडण्यासाठी...!
काही पत्ते... जीवाशी खेळ करणारे...
तर काही पत्ते... हुकुमी एक्क्यासारखे... अमूल्य.. असाधारण.. असामान्य...
काही.. स्वप्नातला बंगला बांधून देणारे..
तर काही पत्ते... चुकीचे पडल्याने आयुष्य उध्वस्त करणारे...
काही पत्त्यांचे चेहरे भकास..
काहींना भल्या श्रीमंतीचा वास..
काहींकडे मात्र प्रामाणिक घाम...
काहींसाठी टेबलखालून दाम..
हे असे निरनिराळे रंगबिरंगी पत्ते घेऊन आयुष्य खेळताना दिसली आज मुंबई...
- आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा