पूर्वी प्रत्येक serial चा कुठलाही episode सुरू व्हायच्याआधी एक frame दाखवायचे... त्यात लिहलेलं असायचं, "या प्रस्तुत कथानकातील सर्व पात्रे 'काल्पनिक' आहेत आणि याचा वास्तवाशी दुरान्वयेही संबध नाही. असल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा."
मी पुन्हा एकदा ती ओळ वाचली. 'सर्व पात्रे काल्पनिक आहेत..' "काल्पनिक"..! "काल्पनिक" म्हटलंय... "खोटं" नाही म्हटलेलं.. कारण, कल्पनेच्या विश्वातच माणूस बऱ्याचदा खरं आयुष्य जगत असतो!!!
तुम्हाला गंमत वाटेल, पण मी अजूनही "एका लग्नाची दुसरी गोष्ट" ; "तिसरी गोष्ट" या serials, you tube वर बघतो. बरेच जण मला चिडवतातही, "काय बायकांसारखा serials बघतो" म्हणून... पण मला असं वाटतं की 'दुसरी गोष्ट' मधला 'घना' किंवा 'तिसरी गोष्ट' मधला 'ओम' मला स्वतःचीच नव्याने ओळख करून देतात!!
म्हणजे काय?? तर, माझ्याच आतमध्ये मला कुठेतरी ते लपून बसलेले दिसतात.. माझ्या आईमधे कधी कधी 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' सिरियल मधल्या 'सुप्रिया काकू, वल्ली काकू' दिसते, माझ्या बाबांमधे 'तिसरी गोष्ट' मधले 'दत्ताभाऊ' दिसतात, माझ्या बहिणीमधे 'कुहू' दिसते...!! ही सगळी पात्रं अशी त्या व्यक्तींच्या भोवताली घुटमळताना दिसतात...
पण यात आता गंमत अशी होते, की माझ्याच आतमध्ये राहणारा हा 'ओम' किंवा 'घना' कधीतरी असा काही एक matured विचार मला देऊन जातो, की मला वाटतं, "यार! हेच खरे आहेत आणि आपण ह्यांची पात्रं आहोत!!!" कारण बऱ्याचदा हीच पात्रं मला inspire करतात, ही पात्रंच मला धीर देतात, आधार देतात, आणि पुन्हा नव्याने काम करण्याची उभारी देतात...!
खरंच, 'कोण खरं आणि कोण खोटं' हे कळेनासं झालंय!!
परवाच 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' चा एक episode बघत होतो.. त्यात असा एक प्रसंग आहे की,
ओम ; superman, spiderman ची लहान मुलांची comics वाचत असतो. तर ईशा त्याला म्हणते, "तू वेडाएस का? एवढा काय involve होतोस त्यांच्यात?? ते fiction आहे.."
त्यावर ओम म्हणतो, "तूच वेडीएस.. अगं आपण fiction आहोत... आणि हे सगळे खरे आहेत!!!"
किती मनापासून आणि innocently बोलतो तो...!
आणि तो जे बोलतो ते खरंच असणार, कारण तोच 'खरा' आहे ना... आणि मी 'काल्पनिक' आहे...
.... त्याच्या म्हणण्याप्रमाणे ....!!!
-आशुतोष पुरोहित 😊
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा