Officially कधीच वेगळे झालो नाही आपण.. परिस्थितीने आपल्याला मोठं केलं इतकंच... आणि मग बदलल्या बऱ्याच गोष्टी... अकरावी बारावीत virtually long drive ला जाणं हे सुद्धा स्वप्न होतं आपलं.. आता बालिशपणा वाटतो तो... का ? माहिती नाही... इच्छा तर असते कुणी असावं सोबत... पण नाही, 'मोठे' आहोत आपण... समाज काय म्हणेल ही चिंता...सतत..... कोणीही बघत नसलं तरी...!
Graduation ला admission घेताना असं वाटलंच नव्हतं की, इथून बाहेर पडताना मी 'असा' असणारे.. पूर्वी माझ्यात ego नव्हते असं नाही... पण आताइतके त्रास देत नव्हते...
तसं first year, second year पर्यंत बऱ्यापैकी तग धरून होतं आपलं relation... पण त्यांनतर खूपच अवघड गेलं सगळं सांभाळणं.. आता असं दिवस दिवस भर चॅटिंग करणं, परवडत नाही आपल्याला... कंपनीमध्ये तुझ्यासोबत चॅटिंग करत बसलो तर सर काय म्हणतील हे टेन्शन असतं..
आता सुद्धा जेव्हा मोठ्या कंपनीमध्ये जॉईन झालो तेव्हा त्यावर तुझा रिप्लाय फक्त 'Woww, all the best!' एवढाच होता...
हेच आपण अकरावी बारावीतले असतो तर..? फोन करून दोन दोन तीन तीन तास वेळ घालवला असता आपण एकमेकांचा...
काय बदलतं असं मोठं झाल्यावर...?
मला पुन्हा वेडं व्हायचंय, पुन्हा ते जुनं व्हायचंय... immatured व्हायचंय....
प्रेमात एकमेकांना immaturity ने वागू देणं, यातच खरी maturity असते ना..? मग तरी का सावरतो, सांभाळतो आपण स्वतःला एकमेकांसमोर तोल गेला तरी..?
इतके habatual झालो आपण etiquettes ना, की एकमेकांशीही अंतर राखून वागायला लागलो आपण... त्यामुळे खडकाळ झालं सगळं... मोकळं नाही, तर सुनसान झालं... फक्त आपण आणि आपलं... बस.. त्यामुळे तू माझ्या आयुष्यात नसल्यामुळे मला फरक पडणारे हेही नक्की नाही सांगू शकत मी तुला... कारण या ऑफिस च्या वातावरणाने ना, बधिर होऊन जातात तुमच्या संवेदना... त्यामुळे कसलाच फरक पडत नाही तुम्हाला... तिथे फक्त काम आणि deadlines असतात ना... मग तुमचं life त्याने इतकं गुरफटून जातं की त्याच्या पलीकडे काही life च उरत नाही...
तुला आठवतंय तू मला म्हटली होतीस,
"Now I can't afford to loose you..."
मला हेच वाक्य पुन्हा ऐकायचंय तुझ्याकडून...
आपण भेटुयात ना पुन्हा...
तसंही तुला आठवत असेल तर starbucks ला जाऊन खर्चिक कॉफी पिण्याचं स्वप्नं अर्धवट आहे आपलं....
तेवढं एक स्वप्नं, 'assignment' आहे असं समजून पूर्ण करू..... नात्याची assignment.....
What say...?
- Written by 'तोषा'..
( Ashutosh Purohit)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा