रविवार, ११ जून, २०२३

दोन ओंजळी..

दोन ओंजळी.. दोन माणसं.. दोन मनं..!!

ती : बोल ना काहीतरी..
तो : काय बोलू ?
ती : मग काय, असे नुसते बसून राहणार आहोत आपण एकमेकांसमोर ?
ती : खरं सांगू ? नाही माहिती मला..
ती : इतकी वर्षं झाली आपल्या संसाराला, एकही मुद्दा उरला नाहीये आपल्यात बोलण्यासारखा..?
तो : नाही.. तसं काही नाहीये.
ती : मग कसंय ?
तो : pch.. मला माहिती नाही गं..
ती : बरं.. जाऊ दे... मग साधं sharing ?
तो : काय share करू ? आत्ता काही नाही share करावंसं वाटते, मला खरंच...
ती : कशी गंमत असते ना ! दोन, अगदी जवळच्या नात्यातल्या व्यक्ती समोरासमोर बसल्या, तर त्यांना साधा विषयही सुचू नये बोलण्याकरता ?
तो : कसं सांगू तुला.. कळत नाहीये मला..
ती : ( त्याच्या हातावर हात ठेवते. त्याचा हात शहारतो.. खूप वर्षांनी असा मोकळा स्पर्श अनुभवत असतो तो..! ) बोल तू.. मी ऐकत्ये..
तो :..... ओझं वाटतं..
ती : कसलं ?
तो : खरं सांगू ? रागवायचं नाही हा..
ती : नाही रे.. बोल ना...
तो : तू माझ्यासमोर आलीस, किंवा आपण असे बसलो ना;  की अचानक एक प्रकारचा ताण जाणवायला लागतो मला आतमधे... यापूर्वी आपल्या झालेल्या गप्पा, त्यावेळी तू दिलेल्या reactions, responses... चुकीच्याच असतात असं नाही म्हणते हा मी... पण कधी मला पटलेल्या असतात, कधी न पटलेल्या.. पटल्या असतील, भावल्या असतील, तर कधीतरी मी तुला दाद द्यायला हात आखडता घेतला असेल.. पटल्या नसतील तर तुला तसं स्पष्टपणे सांगणं मला जमलं नसेल.. या सगळ्याची कोंडी होते मनामधे...
कधी मी तुझ्याबद्दल केलेली interpretations; कधी तू मला कसं interprete करत असशील, याचे मी बांधलेले अंदाज... हे सगळं सगळं असं गर्दी करून उभं राहतं माझ्याच आत... खूप मोठी गुंतवळ आहे ही.. मग या गुंतवळीचं ओझं इतकं होतं, की त्याखाली आपल्या गप्पा, sharing पार दबून जातं..
हाच गुंता सोडवण्यात माझी इतकी energy खर्च होते, की तुझ्याशी गोष्टी share करायला मी energy आणू कुठून ? शिणून जाते, बुद्धी आणि मनसुद्धा..

याचं ओझं वाटतं मला..
आपण आपल्याच व्यक्तीला एक "distinct identity " म्हणून कधी पाहूच शकत नाही का गं ?
सगळी interpretations विसरून, सगळे पूर्वग्रह धुवून, आपण आपल्याच व्यक्तीशी बोलू शकत नाही का ? अगदी मोकळ्या मनाने ?
ती : खरंय तुझं.. मला पण same problem जाणवतो.. पण मी कधी बोलले नाही..
तो : काय करता येईल मग आपल्याला यावर ?
ती : तू माझा मित्र होशील ?.... 
तो : काय ?
ती : दचकू नको... खरंच विचारतेय..
एकमेकांचे नवरा बायको होताना, एकमेकांचे चांगले मित्र व्ह्यायचंच विसरून गेलो रे आपण..
आपण ना, कायम एकमेकांना त्या "नवरा-बायको" च्या typical खिडकीतूनच पाहत आलो...
पण त्याच खिडकीतून, कधीकधी मैत्रीचे कवडसेही धरायचे असतात, हे विसरूनच गेलो होतो आपण...!
पण ठीके.. अजूनही वेळ गेलेली नाहीये.. Better late than never !..
Friends ? ( ती हात पुढे करते )

तो : yaaa... why not..!
( तो तिला हात देतो )

त्यांनी एकमेकांच्या हातात हात दिलाय, त्यावर focus. आणि त्यावेळी मागून speech..
दोन ओंजळी रित्या झाल्या.. दोन हात एक झाले.. !

लग्न होऊन इतकी वर्षं झाल्यावर, 'दोनाचे चार' होण्यापेक्षा 'दोनाचा एक' हात होणं, किती महत्वाचं आहे, हे आज त्यांना कळलं होतं...!!! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा