सोमवार, १८ जून, २०१८

Whatsapp Diaries 1

Last seen today at 10:16 pm..

मी तुझ्या चॅटमधून बाहेर पडतो. 
माणूस नाती स्वार्थासाठी निर्माण करतो हेच खरं..

मी नाही करत तुला msg.. मुद्दाम..
"तिने करावा आपणहून msg मला" , माझा अहं मला सांगत राहतो..
शेवटी तू झोपतेस तशीच.. 
मी इकडे तळमळत राहतो माझ्या अहं ला कुरवाळत..
दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते.
तू ग्रुप वर चांगली active असतेस.
मग एक msg मला करायला काय जात होतं ? 
त्यात तुझा असा अविर्भाव असतो जणू काही आपल्यात काही नाहीचे !
सकाळही तशीच निघून जाते. 
दुपारची जेवणाची वेळ होते..
"Jevlas ka ?" वगैरे msgs ची अपेक्षा कधीच सोडल्ये मी.. 
पण lunch ब्रेक मध्ये 'Hiii' टाकू शकत होतीस... 
संध्याकाळ होते...  मी न राहवून 'Hi' टाकतो. या 'Hi' मधे कटाक्षाने एकंच 'i' येईल याची काळजी घेतो. तुला माझं काहीतरी बिनसलंय याची जाणीव व्हावी म्हणून..
'आता रात्रीचं जेवण होईपर्यंत whatsapp बघायचं नाही' मी ठरवून टाकतो. आता बघू दे तिला माझ्या msgs ची वाट...
मी अधीर मनाने जेवण कसंबसं उरकून, रात्री ऑनलाईन येतो.. खरंतर इतका अधीर असतो मी, की उष्ट्या हातानेच मोबाईल घेणार असतो. पण... आई...?? 

तुझा Last seen जस्ट 15 मिनिटांपूर्वीचा.. 
पण माझ्या msg ला ब्लू टिक नाही ! 
मला मी इतर कुठल्याही सामान्य माणसासारखा वाटायला लागतो तुझ्यासाठी.. 
म्हणजे, ते असतात ना, ज्यांच्याशी आपल्याला फार बोलायचं नसतं खरंतर, म्हणूनच त्यांच्या अशा साध्या 'Hi' ला वगैरे तर आपण जुमानतही नाही.. त्या टाईप चा वाटतो मी मलाच..

रात्री 12 वाजता तुझा Good Night असा msg येतो..
मी तो दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो.
हा Good Night वाचल्यावर माझ्या मनात अनेक प्रश्न असतात.
माझ्या Hi मध्ये तुला काहीच वेगळेपण जाणवलं नाही ?
की जाणवलं पण तूच माझ्यावर रागावल्येस ?
माझ्या Hi ला रिप्लाय नाही द्यावासा वाटला ?
की तू तो का नाही दिलास हे मीच समजून घ्यावं अशी प्रेमळ समजूतदारपणाची अपेक्षा आहे तुझी ?

एवढा डोक्याचा भुगा तुझं एक Good Night वाचल्यावर होतो.
पण एवढं सगळं Whatsapp वर कुठं लिहीत बसणार ?
मी तो चॅट तसाच सोडून जातो.

थोड्या वेळाने Whatsapp बघतो, तर तुझा Good Morning असा msg..
माझा अहं सुखावतो.
मी रिप्लाय न दिल्यामुळे तुला फरक पडतो काहीतरी हे कळल्यावर बरं वाटतं खूप ! 
किती विलक्षण आहे  !
स्वतःच्या msgs वरही एवढं ममत्व धरून असतो आपण !
मी मुद्दाम तोही चॅट ओपन न करता तसाच whatsapp मधून बाहेर पडतो.
ज्या यातना मला झाल्या, तुझी ब्लू टिक न दिसल्यामुळे, त्या तुलाही होऊ देत असा आसुरी उद्देश.. 

Bol na re..
जितके dots कमी, तितका दर्द जास्त.. 
तू मोजक्या हाताने दोनच dots टाकतेस..
तुझा नेहमीचं शस्त्र अखेरीस तू काढतेस. लाघवीपणाचं..
तुझ्या या bol na re मधल्या na आणि re या शब्दांनी मी घायाळ होतो.. 
तुलाही माहित्ये ते..

आता मी भरभरून बोलतो.
तुझेही तसेच भरभरून रिप्लाय आले असतील या अपेक्षेने मी whatsapp उघडतो..
तर,
Last seen today at 10:16 pm.. 
जस्ट 15 मिनिटांपूर्वीचा..

No blue tick, No Conversation. 

मी तुझ्या चॅटमधून बाहेर पडतो.
माणूस नाती स्वार्थासाठी निर्माण करतो हेच खरं..

- आशुतोष पुरोहित

१५ टिप्पण्या:

  1. लिखाण चांगलाच आहे. वेगवेगळे विषय आणि वेगवेगळ्या लेखन पद्धती हाताळाव्यात असे सुचवेन. खूप लिही, समृद्ध हो ह्या सदिच्छा...

    उत्तर द्याहटवा
  2. लिखाणाची शैली ओघवती आहे जणू अखंड वाहणारा झरा.

    उत्तर द्याहटवा
  3. Kharach khup chan.. tujhya ya shabdant svhtala pahu ithpasun tr he shabda vichar karayla lavtat ithparynt!

    उत्तर द्याहटवा