मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

एक संध्याकाळ

* एक संध्याकाळ...!! *
एक संध्याकाळ अशी असावी,
मनाची कवाडं उघडत जावी...
आकाशाच्या कँन्व्हासवरती,
नक्षी मनातली उमटावी...!!

एक संध्याकाळ अशी असावी..
स्वप्नातल्या परिराणीसारखी..
रुणझुणते पैंजण बांधून ,
थुईथुई नाचणार्या मोरासारखी...!!

एक संध्याकाळ अशी असावी...
मैफिल स्वरांची रंगत जावी...
आभाळाच्याही काना-कोपऱ्यात..
वादी-संवादींची फुले जन्मावी...!!!

एक संध्याकाळ अशी असावी..
चाफ्यासारखी दरवळणारी...
खोल श्वासात हुंगत रहावी...
असा आल्हाद देणारी..!!

एक संध्याकाळ अशी असावी...
पिकल्या पानावरही हिरवळ यावी..
थकल्या-भागल्या वृध्द जीवांवर...
थोडं 'तारुण्य' शिंपडून जावी...!!!

-तोषा

1 टिप्पणी: