त्या दिवशी घरी एकटाच होतो... अचानक एक गोड जुनं फूल आठवलं आणि डोळ्यांत पाणी आणून गेलं...
त्या फुलाची गंमत सांगू ?
आम्ही,
बोललो तरी मला problem, बोललो नाही तरी problem...
आठवण आली तरी problem, आठवण आली नाही तरी problem..
विचार केला तरी problem, विचार केला नाही तरी problem...
पाऊस पडला तरी problem, नाही पडला तरी problem...
त्या फुलाला माझी आठवण येण्याचं खरं काहीच कारण नाही...
आणि आता इतकं जुनं मला आठवण्याचंही काहीच कारण नाही...
पण कारणाशिवाय घडलेल्या गोष्टीतंच मन अधिक गुंततं, नाही ?
त्या फुलाला माझी आठवण नाही आली तरी problem, आणि आलीच चुकून कधी तर मग खूपच problem....
तशात हा वेडा पाऊस.....
असो.....
-आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा