पळतोय आपण फक्त.. सत्यापासून, जगापासून.. आज कोणाशीही काहीही share करायचं झालं, तरी प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा व्हाट्सapp जवळ करतो आपण. एक बंद खोली आहे. त्यात ठासून भरलंय आपलं मन. त्या खोलीला एकच अरुंद फट आहे दरवाज्यापाशी. त्या फटीतून जे काही व्यक्त व्हायचं तेवढं व्हायचं.. whatsapp वर बोलताना हे exactly असंच जाणवतं...
माणसांशी जेव्हा आपण समोरासमोर बसून बोलतो ना, तेव्हा त्या आपल्या बंद खोलीचं छतच फोडून मोकळं करून टाकतो आपलं अवकाश..
तो जो एक जडपणा आहे नं नात्यातला, तो त्रास द्यायला लागला की समजावं, आता हे नातं वेगळ्या पद्धतीनं हाताळण्याची गरज आहे.. नुसत्या वरवरच्या attatchment पेक्षा काहीतरी गहिरं घडत चाललंय.. आता बोलण्यापेक्षा अबोल्यानं समोरच्याला समजून घेणं आवश्यक आहे.. नात्याच्या याच stage ला कशी batting करायची हे कळत नाही अनेकांना.. प्रत्येक ball वर sixer मारायची नसते.. किंबहुना मारुच शकत नाही आपण.. आजवर हसत खेळत असलेलं रंगीबेरंगी नातं अचानक introvert होतं , आपल्यालाही introvert करून जातं.. म्हणूनच कदाचित 'संसार' करण्यालासुद्धा कला म्हणत असावेत.. कारण इथं समोरून येणाऱ्या ball ला आधी शांतपणे समजून घ्यायचं असतं आणि मग bat फिरवायची असते.. सुरुवातीच्या दिवसांमधले षटकार आणि चौकार यांचं आकर्षण आता संपलेलं असतं.. आता हवा असतो विचारी खेळ...! मग सगळे balls डॉट का जाईनात.. आपण pitch वर तग धरून उभं राहणं महत्वाचं.. आपल्या साथीदारासाठी..!
- आशुतोष पुरोहित
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा